बेकायदा टपऱ्यांचा विळखा
बोईसर, ता.३ (वार्ताहर): बोईसर परिसरात रस्त्यालगत वाढलेल्या अनधिकृत टपऱ्या, फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शाळा, बाजारपेठ, मुख्य रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच आरोग्य सेवांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामपंचायत व संबंधित विभागाकडून अधूनमधून कारवाई होत असली, तरी तात्पुरती ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनधिकृत टपऱ्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करून पुन्हा दुकाने उभारणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
-----------------------
मासिक सभेमध्ये ठरल्याप्रमाणे संबंधित कामासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आलेली आहे. पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच त्वरित कारवाई सुरू करण्यात येईल.
- कमलेश संखे, ग्रामपंचायत अधिकारी, बोईसर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.