वाढवण महामार्गाच्या भूसंपादनाला गती
संपादित जमिनींच्या सातबारा अभिलेख शिबिरांना सुरुवात
बोईसर, ता.३(वार्ताहर): वाढवण बंदर (ग्रीनफिल्ड महामार्ग) प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशासनाने संपादित जमिनींचे ७/१२ अभिलेख अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिर घेणार आहे. या उपक्रमामुळे जमिन नोंदींची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक, वेगवान होण्याची अपेक्षा आहे.
वाढवण परिसरातील संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांच्या सभागृहात ही शिबिरे होणार असून, प्रत्येक गावासाठी वेगवेगळ्या तारखा संबंधित विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी, जमिनधारकांनी ठरवलेल्या तारखेनुसार आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तहसीलदार, पालघर तसेच उपविभागीय अधिकारी, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे पार पडत आहेत.
----------------------
थेट गावातच सेवा
विशेष म्हणजे, वाढवण महामार्गासाठी भूसंपादन होत असलेल्या विविध ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असून, यामुळे नागरिकांना थेट त्यांच्या गावातच सेवा उपलब्ध होत आहे. प्रशासनाच्या पुढाकाराने स्थानिकांना मोठा दिलासा मिळत असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीला देखील वेग मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.