मुंबई

तारापूर MIDC मध्ये ‘रासायनिक मृत्यूचा नाला’

CD

तारापूर परिसरात डासांचा प्रादुर्भाव
एमआयडीसीतील नाल्यांमध्ये रसायनांचा विसर्ग
बोईसर, ता.३ (वार्ताहर): तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नाल्यांमधून उघडपणे वाहणाऱ्या रासायनांमुळे परिसरात डासांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे एकीकडे दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
काही उद्योग नियम धाब्यावर बसवून कोणतीही प्रक्रियेविना सांडपाणी थेट नाल्यात सोडत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाया केवळ कागदावर सुरू असून नोटीसा बजावण्याचे सोपास्कार केले जात आहेत. पर्यावरण तज्ज्ञांच्या इशाऱ्यानुसार, दीर्घकाळ अशाच प्रकारे प्रदूषण सुरू राहिल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि स्थानिक जैवविविधतेवर अपरिवर्तनीय परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाल्यांतून वाहणारे रासायनिक पाणी थेट जमिनीत मुरत असल्याने भूजल दूषित होण्याचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा रंग बदललेला दिसत असून असह्य दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक दाबून चालावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! बालाजीनगरात भरदिवसा आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO

Gold Rate Today: पेट्रोल-डिझेलनंतर आता सोनंही महागलं! काय आहे ताजा भाव?

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

SCROLL FOR NEXT