हजारो भाविक महालक्ष्मीपुढे नतमस्तक
डहाणूत यात्रेला सुरुवात, धार्मिक परंपरांचे दर्शन
कासा, ता. ३ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला गुरुवारी मध्यरात्री विधिवत सुरुवात झाली. या यात्रेला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व असल्याने हजारो भाविक दाखल झाले आहेत.
आदिवासी समाजाची कुलदेवता असलेली महालक्ष्मी देवीची यात्रा तब्बल पंधरा दिवस चालणार आहे. यात्रेची सुरुवात चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. सातवी कुटुंबातील पुजारी मोरेश्वर सातवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुजारी एकट्याने देवीचा ध्वज घेऊन डोंगर चढतो. डोंगराच्या माथ्यावर पोहोचून तुपाचा दिवा प्रज्वलित करून ध्वज फडकविल्यानंतर यात्रेला प्रारंभ होतो. अरुंद जागा, जोरदार वाऱ्याच्या परिस्थितीतही हा विधी पार पाडला जातो, अशी श्रद्धा पुजाऱ्यांनी व्यक्त केली.
--------------------
इतिहासाला उजाळा
इसवी सन १००० मध्ये सुलतान महमूद व नंतर गजनीच्या महमूदाने मंदिरावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात लूट केल्याचा उल्लेख बखरकार फेरिस्तो यांच्या नोंदीत आढळतो. त्या वेळी सात लाख सुवर्ण दिनार, मोठ्या प्रमाणात सोन्याच्या वस्तू लुटल्या गेल्याचे सांगितले जाते. बादशहा अकबर हा राजा तोरडमल यांच्यासह येथे दर्शनासाठी आला होता, तर पंजाबचे शासक महाराजा रणजितसिंह यांनी मंदिरावर सोन्याचा कळस चढवला होता.
-------------------------------
ध्वजारोहणाचा सोहळा
- यात्रेदरम्यान हजारो भाविक डोंगर चढून देवीचे दर्शन घेतात, तर काही भाविक पायथ्यावरील मंदिरात पूजा आर्चा करतात. कडक उन्हामुळे दिवसा तुलनेत सायंकाळी भाविकांची संख्या अधिक दिसून येत आहे.
- मंदिरात आदिवासी पुजारी पारंपरिक ‘सोवळे’ नेसून पूजा करतात. यात्रेपूर्वी दोन महिने उपवास, जप केला जातो. मध्यरात्री ध्वज घेऊन डोंगर चढतो. त्या दिवशी अंगात वेगळीच शक्ती संचारते.
-----------------------
यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे.
- अमर पाटील, पोलिस अधिकारी, कासा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.