मुंबई

हवामानाचा अंदाज चुकणार

CD

हवामानाचा अंदाज चुकणार
जिल्ह्यातील स्वयंचलित केंद्र बंद, शेतकऱ्यांना फटका
वाणगाव, ता. ३ (बातमीदार) : देशभरातील २०० कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज देणारी जिल्हा स्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्रे २१ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय भारत सरकारच्या हवामान विभागाने घेतला आहे. निधीची कमतरता, धोरणात्मक बदलांमुळे हा निर्णय घेण्यात आला असला तरी पालघरसह ११ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आता हवामानाचा अचूक अंदाज मिळणार नाही.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि भारतीय हवामान विभाग यांच्या सामंजस्य करारातून २०१७ मध्ये जिल्हास्तरीय हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये ‘ग्रामीण कृषी मौसम सेवा’ अंतर्गत प्रत्येक केंद्रात एक कृषी हवामानतज्ज्ञ, एक कृषी हवामान निरीक्षक अशा दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. २०२१ ते २०२६ या पाच वर्षांसाठी नीती आयोगाकडून प्रकल्पाला निधी मंजूर झाला होता. मात्र, अर्थसंकल्पीय तरतूद (बजेट) संपल्याचे कारण देत सेवा खंडित केल्या आहेत. कोसबाड येथील कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना कृषी सल्लासह हवामान अंदाजदेखील वर्तवण्यात येत असे. मात्र, हवामान विभागाकडून कोणतीही माहिती मिळणार नसल्याने नागरिकांचे नुकसान होणार आहे.
----------------------------------
३० हजार शेतकऱ्यांना आधार
कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रांतर्गत चालणारे हवामान केंद्र पाच वर्षांत जिल्ह्याची जीवनवाहिनी ठरले होते. या केंद्रामार्फत हवामान, पावसाची स्थिती, वाऱ्याचा वेग, वीज कोसळण्याची शक्यता, पिकांचे नियोजनाची माहिती पुरवली जात होती. ७० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सच्या माध्यमातून पालघरमधील ८५० गावांतील जवळपास ३० ते ४० हजार शेतकरी थेट केंद्राशी जोडलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळले आहे.
------------------------------
११ जिल्ह्यांवर परिणाम
पालघर, नागपूर, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, भंडारा,गडचिरोली, बुलढाणा, अमरावती, वाशीम ११ जिल्ह्यांमध्ये ही जिल्हास्तरीय केंद्रे प्रभावीपणे काम करत होती. पालघरमधील एकमेव स्वयंचलित हवामान केंद्र दर १५ मिनिटांनी नोंदी घेत होते. चक्रीवादळ, अवकाळी पाऊस किंवा उष्णतेच्या लाटेत हे केंद्र शेतकऱ्यांसाठी ‘सुरक्षा कवच’ ठरले होते, पण आता ही यंत्रणा गुंडाळली जाणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेत अस्थिरता येण्याची शक्यता आहे.
-----------------------------------
हवामानातील अस्थिरता हा आता सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. आमचे केंद्र शेतकऱ्यांना केवळ पावसाचा आकडा सांगत नाही, तर त्या बदलत्या हवामानात पीक कसे वाचवायचे याचे तांत्रिक मार्गदर्शन करते. भविष्यात तालुका स्तरावर अधिक केंद्रे उभारण्याची गरज आहे.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
--------------------------
कृषी विज्ञान केंद्रांतर्गत असणारी हवामान केंद्रे वादळ, वारा, पाऊस, आर्द्रता, उष्णता, थंडी इत्यादीबाबत अचूक अंदाज देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे नियोजन करणे सोपे जात होते. हवामान केंद्रे बंद झाल्याने नुकसान होणार आहे. त्यामुळे हा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी आहे.
- मिलिंद बाफना, प्रगतिशील शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT