मुंबई

विषारी धुराला ब्रेक

CD

१० वर्षांचा डम्पिंगचा डोंगर हटणार
उल्हासनगरच्या महापौरांचा दौरा; कचरा हटवण्याचे आदेश
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असलेला डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. महापौर अश्विनी निकम यांनी स्वतः डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वारंवार लागणारी आग आणि त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देताना, येत्या मे महिन्यापर्यंत हे डम्पिंग ग्राउंड हटवण्याचे ठोस आश्वासन महापौरांनी दिले आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ येथील अवैध डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित आहे. या डम्पिंगमुळे परिसरात दुर्गंधी आणि वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना घडतात. यामुळे संपूर्ण परिसरात विषारी धूर पसरत असून, नागरिकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ अशा गंभीर व्याधींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्थानिक रहिवाशांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि प्रशासनाला हा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले.

पाणीटंचाईवरही उपाययोजनांचे निर्देश
महापौरांच्या दौऱ्यादरम्यान स्थानिक महिलांनी डम्पिंगच्या प्रश्नासोबतच भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईचा मुद्दाही मांडला. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर महापौरांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.

मे महिन्यापर्यंत तोडगा निघणार
अवैध डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे हटवण्यासाठी महापालिकेने विशेष कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना महापौरांनी दिल्या आहेत. मे महिन्यापर्यंत हा परिसर कचरामुक्त करण्याचे आश्वासन मिळाल्याने स्थानिकांमध्ये आशेचे वातावरण आहे. आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

चंद्रपूर मनपामध्ये अविश्वासाचे ढग, भाजपातील अंतर्गत वाद चिघळणार; संख्याबळाचे समीकरण गुंतागुंतीचे

महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; राज्यात ३५ हजार ८७६ पदांची भर, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती

सावकारने किडनी विकलेल्या चंद्रपुरातील शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी, न्यायासाठी रोशन कुडेंची पायपीट सुरूच...

Lamangaon-Takli leopard scare: लामणगाव-टाकळी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार; ग्रामस्थ भयभीत, वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप

SCROLL FOR NEXT