तीन कोटींचे सोने व १७.५० लाखांची रोकड जप्त
सराफांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक
ठाणे, ता. ३ : दिवाळीच्या मुहूर्तावर शुद्ध सोन्याचे प्रलोभन दाखवून सराफ व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या घटक-१ पथकाने अटक केली आहे. जीवाराम वांजी चौधरी (वय ४६, रा. राजस्थान) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून तीन कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या सात लगड्या आणि १७ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
आरोपी जीवाराम चौधरी याने २०२५ मध्ये ठाणे आणि भिवंडीतील सराफांना कमी दरात उच्च दर्जाचे सोने देण्याचे प्रलोभन दाखवून मोठी फसवणूक केली होती. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा केल्यापासून आरोपी सतत आपली ठिकाणे बदलून विविध राज्यांत पोलिसांना चकवा देत फिरत होता.
आरोपी घोडबंदर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच, ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने २३ मार्च २०२६ रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिस कोठडीत असताना झालेल्या सखोल चौकशीतून ठाणे आणि राजस्थानमधील पाली जिल्ह्यातून १,९५७.७९ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सात लगड्या आणि रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
पोलिस प्रशासनाची यशस्वी कामगिरी
ही कारवाई पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपआयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक घुगे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.