

Abhijeet Dipke Interview Cockroach Janata Party
esakal
Political funding controversy : सध्या सोशल मीडियावर आणि देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषत: या चळवळीला कोणाकडून फंडिंग मिळतंय का?, यावरून विविध चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी एका मुलाखतीत या सर्व आरोपांवर भाष्य करत स्पष्ट भूमिका मांडली. फंडिंगच्या आरोपांना फेटाळून लावत त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची संकल्पना, उद्देश आणि भविष्यातील राजकीय वाटचालीबाबतही महत्त्वाचे खुलासे केले आहेत.