पोल्ट्री, घरांसह वीटभट्ट्यांचे प्रचंड नुकसान
टोकावडे, ता. ३ (बातमीदार): मुरबाड तालुक्यात गुरुवारी (ता. २) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक घरांची पडझड झाली असून पोल्ट्री फार्म आणि वीटभट्टी व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सुदैवाने, या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
टोकावडे, न्याहाडी, धसई, तळेगाव, वाल्हीवरे आणि मोरोशी या भागांमध्ये पावसाचा सर्वाधिक प्रभाव जाणवला. वेगवान वाऱ्यामुळे अनेक घरांवरील कौले आणि पत्रे उडून गेले. खरशेत येथील दुंदा रघुनाथ पवार व मंगल माधवी यांच्या घरांचे नुकसान झाले, तर मोरोशी येथे मोहन देशमुख यांच्या पोल्ट्री फार्मची भिंत कोसळली. फांगुळगव्हाण येथील पालो सोंगाळ यांच्या घरासह गावातील समाजमंदिराचेही नुकसान झाले आहे. मोरगाव आणि गणेशपूर परिसरातही घरांची कौले उडाल्याच्या नोंदी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.