मुंबई

रायगड जिल्ह्यातील मतदारयादीतील ''मॅपिंग'' प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

CD

मतदार यादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) ः मतदार यादीत अधिक अचूकता येण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारी सध्या सुरू आहे. याअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील मतदारांचे २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी यात सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
२००२ मध्ये शेवटचा सखोल पुनरीक्षण कार्यक्रम झाला होता. आता पुन्हा तीच प्रक्रिया राबवली जाणार असल्याने, सध्याच्या मतदार यादीतील नावांची जुन्या नोंदींशी सांगड घातली जात आहे. हे मॅपिंग दोन प्रकारे करता येणार आहे. ज्या मतदारांचे नाव २००२ च्या यादीत आधीपासूनच होते, त्यांनी थेट स्वतःच्या नावाचे मॅपिंग करावे किंवा ज्या तरुण मतदारांची नावे २००२ मध्ये नव्हती, त्यांनी आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाचा आधार घेऊन आपले नाव लिंक करावे. मॅपिंगसाठी मतदारांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा २००२ मधील यादीभाग क्रमांक आणि अनुक्रमांक आवश्यक आहे. हा तपशील मिळवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तेथे उपलब्ध असलेल्या २००२ च्या मतदार यादीच्या पीडीएफमधून कुटुंबाचा जुना तपशील शोधता येणार आहे.
मतदार यादी अधिक पारदर्शक आणि निर्दोष करण्यासाठी हे मॅपिंग महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या संबंधित बीएलओशी संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.


नागरिकांनी काय करावे?
१. ऑनलाइन पोर्टलवरून स्वतःचा किंवा पूर्वजांचा २००२ मधील तपशील मिळवावा.
२. हा तपशील घेऊन आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घ्यावी.
३. याशिवाय सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपले आणि आपल्या कुटुंबाचे मॅपिंग पूर्ण झाल्याची खात्री करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

चंद्रपूर मनपामध्ये अविश्वासाचे ढग, भाजपातील अंतर्गत वाद चिघळणार; संख्याबळाचे समीकरण गुंतागुंतीचे

महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; राज्यात ३५ हजार ८७६ पदांची भर, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती

सावकारने किडनी विकलेल्या चंद्रपुरातील शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी, न्यायासाठी रोशन कुडेंची पायपीट सुरूच...

Lamangaon-Takli leopard scare: लामणगाव-टाकळी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार; ग्रामस्थ भयभीत, वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप

SCROLL FOR NEXT