उल्हासनगरमध्ये चोरांचा हैदोस
मंदिरात पूजा करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र लांबवले
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : शहरात चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, आता थेट मंदिरात घुसून चोरी करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या २४ तासांत घडलेल्या या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली धक्कादायक घटना विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मराठा सेक्शन भागात गुरुवारी (ता. २) सकाळी घडली. जयश्री पाटील या शिक्षिका महादेवाच्या मंदिरात पूजा करत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणांनी त्यांच्या गळ्यातील ७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून नेले. या दागिन्याची किंमत सुमारे ४२ हजार रुपये आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोणार गल्ली परिसरात घडली. पायी जाणाऱ्या पुष्पा तोमर यांची पर्स एका १८ वर्षीय तरुणाने हिसकावून पोबारा केला. या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३१,५०० रुपयांचा मुद्देमाल होता. याप्रकरणीही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारीत वाढ?
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर सामाजिक कार्यकर्ते निखिल गोळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले तरुण व्यसनासाठी अशा चोऱ्या करत असून, पोलिसांनी तातडीने गस्त वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या दोन्ही घटनांनंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, तपासचक्र गतिमान झाले आहे. आम्ही दोन्ही घटनांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहोत. आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया उल्हासनगर पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.