मुंबई

शेतकऱ्यांना समृद्ध शेतीचे धडे

CD

मुगाव येथे रंगली ‘डिजिटल शेतीशाळा’
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
शहापूर, ता. ३ (वार्ताहर) : राज्य सरकारचे कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्यातील मुगाव येथे भव्य ‘डिजिटल शेतीशाळा’ पार पडली. ‘बदलूया रीत शेतीची... वाढवूया रास समृद्धीची’ या अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आधुनिक आणि समृद्ध शेतीचे धडे गिरवले.

राज्यातील शेतकरी प्रगत शेती व्यवस्थापनाच्या माध्यमातून सक्षम व्हावा, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तज्ज्ञांनी डिजिटल माध्यमाद्वारे शेतकऱ्यांना प्रगत शेती तंत्रज्ञान आणि बदलत्या हवामानाचा सामना कसा करावा, याचे सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने पेरणीपूर्व मशागत, माती व्यवस्थापन, निविष्ठा उत्पादन, एकात्मिक कीड नियंत्रण आणि भातशेतीचे प्रगत तंत्रज्ञान यावर ऑनलाइन माहिती देण्यात आली.

प्रशासकीय मार्गदर्शन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे व तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. सहाय्यक कृषी अधिकारी माहेश्वरी भोसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ‘डिजिटल शेतीशाळे’चे महत्त्व पटवून दिले. तसेच, आगामी ‘फार्मर कप’ स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि शेतकरी गट स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्या आणि परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती आणि आधुनिक शेतीचे तंत्र समजल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. डिजिटल शेतीशाळेमुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही आता प्रगत तंत्रज्ञान घरबसल्या उपलब्ध होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT