मुंबई

रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटली

CD

एमआयडीसीत रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटली
उग्र दर्पामुळे नागरिक हैराण
डोंबिवली, ता. ३ : औद्योगिक क्षेत्रातील निष्काळजीचा आणखी एक गंभीर फटका स्थानिक नागरिकांना बसला आहे. के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाजवळ रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी गुरुवारी (ता. २) रात्री अचानक फुटल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. या घटनेमुळे एमआयडीसी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या गटाराच्या कामादरम्यान यंत्रसामग्रीचा धक्का लागल्याने ही वाहिनी फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशिरा वाहिनी फुटल्याने रासायनिक सांडपाणी थेट रस्त्यावर आणि नाल्यांमध्ये वाहू लागले. यामुळे परिसरात उग्र वास पसरला असून, काही वाहनचालकांना या साचलेल्या दूषित पाण्यातून मार्ग काढावा लागला. यामुळे वाहनांचे इंजिन बिघडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे अधिकारी आणि दुरुस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सांडपाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने असल्याने तातडीने दुरुस्ती करणे कठीण झाले होते. अखेर पहाटे अडीचच्या सुमारास प्रवाह नियंत्रित केल्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

वारंवार होणाऱ्या चुकांमुळे संताप
याच परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे यापूर्वीही महानगर गॅस आणि महावितरणच्या भूमिगत वाहिन्यांचे नुकसान झाले होते. परिणामी, मिलापनगर आणि जिमखाना परिसरातील नागरिकांना तासन्‌तास अंधारात आणि गॅसविना राहावे लागले होते. ऐन उन्हाळ्यात मूलभूत सेवांचा बोजवारा उडत असल्याने ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आंदोलनाचा इशारा
ठेकेदारांची निष्काळजी वारंवार समोर येत आहे. प्रशासनाने यावर वेळीच कठोर कारवाई केली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मिलापनगरचे स्थानिक रहिवासी डॉ. मंगेश पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT