मुंबई

धोकादायक गतिरोधकामुळे अपघाताची भीती

CD

धोकादायक गतिरोधकामुळे अपघाताची भीती
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील धक्कादायक प्रकार

जोगेश्‍वरी, ता. ३ (बातमीदार) : उपनगरातील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील रामवाडी ते प्रतापनगर परिसरात असलेल्या धोकादायक गतिरोधकामुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येथे नेहमीच वाहनांची वर्दळ पाहण्यास मिळते. असे असतानाही फक्त धोकादायक गतिरोधकच नाही, तर येथे पदपथांचाही अभाव जाणवत असल्याने स्थानिक नागरिकांनी यावर काही तरी तोडगा काढावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून मुलुंड, घाटकोपर, वाशी, पनवेल या दिशेने अनेक परिवहन सेवेच्या गाड्या प्रवास करत असतात. तसेच सिप्झ म्हणा किंवा पवई एल ॲण्ड टीसाठी जाणारे अनेक नोकरदारवर्गही याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे येथे ट्राफीक होतानाचे चित्र असते. अशात येथे उभारण्यात आलेल्या गतिरोधकांवर खड्डे पडले असल्याने खासकरून दुचाकीस्वारांना गाडी चालवताना सावधानता बाळगावी लागते. दुसरे म्हणजे, येथील अनेक गतिरोधकांवरील सफेद पट्टे नष्ट झाल्याने वेगात असलेल्या वाहनांना हे गतिरोधक दिसत नाहीत. ज्यामुळे अपघाताची भीती येथे निर्माण झाली आहे.

फक्त गतिरोधकच नाही, तर या मार्गावरील पदपथांचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. रामवाडी सिग्नल परिसरात चोवीस तास ट्रॅफिक झालेली असते. त्यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना पदपथ नसल्यामुळे या ट्रॅफिकमधून वाट काढत जावे लागते. येथील ट्रॅफिक व पदपथांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर तातडीने काही तरी तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

एक्सपायरी संपलेली बिस्किटं अन् कोल्डड्रिंक्सवर नवीन तारीख लावून विक्री, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

SCROLL FOR NEXT