मुंबई

आंबा उत्पादनात ९० टक्के घट

CD

आंबा उत्पादनात ९० टक्के घट
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची माहिती; शासनाची भरपाई कागदावरच; सर्व्हे, बैठक आणि आश्वासनांच्या फेऱ्यात अडकला बागायतदार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३ : कोकणाला लाभलेले निसर्गाचे वरदान म्हणून ओळखला जाणारा ‘फळांचा राजा’ हापूस आंबा यंदा अभूतपूर्व संकटात सापडला आहे. देश-विदेशात मोठी मागणी असलेल्या या आंब्याच्या हंगामाकडे दरवर्षी उत्सुकतेने पाहिले जाते; मात्र यंदा बदलत्या हवामानामुळे आंबा व काजू या दोन्ही नगदी पिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. उत्पादनात तब्बल ९० टक्क्यापर्यंत घट झाल्याचे चित्र असून, उर्वरित पिकावरही रोग व अवकाळी पावसाचे सावट कायम उभे ठाकले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
रायगड जिल्ह्यात १२ हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र असून, सुमारे १२ हजार हेक्टरवर आंबा लागवड करण्यात आली आहे. यातील ९० टक्के आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. हापूसच्या पहिल्या पेटीसाठी मुंबई-पुणे बाजारपेठेत श्रीमंत ग्राहकांची लिलावात चढाओढ असते, परंतु यंदा पहिला आंबा कोण खाणार? हा प्रश्नच अनुत्तरित राहण्याची वेळ आली आहे. हवामानाचा घातक खेळ निसगनि मांडला असून, बागायतदारांचे प्रचंड नुकसान केले आहे. यंदाच्या हंगामात हवामानाने अक्षरशः लपंडाव खेळला आहे. पाऊस उशिरा थांबला तसेच थंडी उशिरा सुरू झाली तर तापमानातील अचानक झालेल्या चढउतारामुळे डिसेंबरमधील आंब्याचा मोहोराचा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यातच जानेवारीनंतर अचानक तापमान वाढल्याने मोहोर गळून पडला. परिणामी, उत्पादनावर मोठा परिणाम झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व अलिबाग येथे बहुतांश भागात सुरुवातीला मोहोर दिसत असला तरी प्रत्यक्षात फळ धारणा अत्यल्प राहिली. सध्या अनेक ठिकाणी केवळ १० टक्केच आंबा शिल्लक असून, त्यालाही अवकाळीचा फटका बसत आहे.

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्यातील आंबा फळपीक उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची शासनाला पूर्ण जाणीव आहे. नुकसानग्रस्त बागायतदारांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या असून, नुकसानीचा अहवाल आल्यानंतर त्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य ती नुकसानभरपाई निश्चित केली जाईल. शासन या विषयात अत्यंत सकारात्मक असून, आंबा उत्पादकांना निश्चितपणे न्याय मिळेल.
- भरत गोगावले, फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात १२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा फळ बागायती क्षेत्र आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे या फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात ९० टक्के आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्ह्यात विद्यापीठाच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांकडून नुकसानीचा सर्व्हे करण्यात आला. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून, या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत अद्याप शासन स्तरावरून आदेश आलेले नाहीत. शासनाकडून जे आदेश येतील त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल.
- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: १४ किमी सायकल प्रवास ते चेन्नईकडून पदार्पण! शिक्षामित्र असलेल्या बापाच्या लेकाचा IPL प्रवास सुरू, कोण आहे प्रशांत वीर?

सुनील तावडे यांच्या लेकीने घेतलेला लग्नाआधीच सासरी राहण्याचा निर्णय; 'हे' होतं कारण, म्हणाले- तिची सासू...

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

SCROLL FOR NEXT