मुंबई

नालेसफाईसाठी ठाणे महापालिकेची कंबर कसली

CD

नालेसफाईत ‘रोबोट’ची मदत
पावसाळ्यापूर्वी ठाणे पालिका सज्ज; ११.५० कोटींची तरतूद
ठाणे, ता. ३ : पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईवरून दरवर्षी टीकेचे धनी होणाऱ्या ठाणे महापालिकेने यंदा वेळेत आणि प्रभावीपणे काम पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील सुमारे ३८५ किलोमीटर लांबीच्या नाल्यांच्या स्वच्छतेसाठी पालिकेने ११.५० कोटी रुपयांचे व्यापक नियोजन केले असून, यंदा प्रथमच आधुनिक ‘रोबोटिक’ यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत नऊ प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या मुख्य नाले आणि उपनाल्यांची सफाई केली जाणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून, १५ एप्रिलपर्यंत कार्यादेश दिले जातील. त्यानंतर २० एप्रिलपासून प्रत्यक्ष नालेसफाईला सुरुवात होईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या कामांवरील खर्चात वाढ करण्यात आली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान
यंदाच्या नालेसफाईचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. शहरातील वर्दळीच्या आणि कठीण ठिकाणी पहिल्या टप्प्यात १० रोबोटिक यंत्रणा तैनात केल्या जाणार आहेत. यामुळे मनुष्यबळावरील अवलंबित्व कमी होऊन कामात गती येईल. खाडीकिनारी असलेल्या कळवा आणि माजिवडा-मानपाडा भागात यांत्रिक पद्धतीने गाळ काढला जाणार आहे. तसेच, संपूर्ण कामाचे चित्रीकरण (व्हिडिओग्राफी) करून त्यावर अधिकाऱ्यांमार्फत कडक देखरेख ठेवली जाणार आहे.

पाणी साचण्याच्या समस्येवर लक्ष
अनेकदा नालेसफाई होऊनही नाल्यांच्या शेवटच्या टोकावर गाळ साचल्याने पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. यंदा कल्व्हर्ट्सची सफाई आणि नाल्यांच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. ब्गेल्या काही वर्षांतील अनुभवातून धडा घेत, पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये आणि अपघात टाळता यावेत, यासाठी यंदा पालिकेसमोर हे काम वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

प्रभागनिहाय नाल्यांची संख्या :
कळवा : २०१
दिवा : १३१
मुंब्रा : ८० ना
नौपाडा : ४९
माजिवाडा-मानपाडा : ४४
वागळे इस्टेट : ३८
लोकमान्य-सावरकरनगर : ३४
वर्तकनगर : २९
उथळसर : ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT