मुंबई

पंजाबमधील तस्करांशी कनेक्शन

CD

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : पंजाबमधून महाराष्ट्रात होणाऱ्या अमली पदार्थ आणि बेकायदा शस्त्रास्त्र तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर, नवी मुंबई पोलिसांनी दीपक चणचण सिंग खैनाल याला मुंबईतील विक्रोळी परिसरातून बुधवारी (ता. १) अटक केली. अमली पदार्थविरोधी पथकाने १५ मार्चला केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेले ऑस्ट्रिया बनावटीचे महागडे ‘ग्लॉक’ पिस्तूल दीपकने पंजाबमधून मागविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

अमली पदार्थविरोधी कक्षाने १५ मार्चला नाशिक ते पुणे असा सिनेस्टाईल पाठलाग करून पंजाबच्या तीन तस्करांना अटक केली होती. त्यांच्याकडून ४१ लाखांचे हेरॉईन आणि १०.५ लाखांचे ‘ग्लॉक’ पिस्तूल जप्त करण्यात आले होते. हे महागडे परदेशी पिस्तूल तस्करांकडे आले कुठून, याचा तांत्रिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केला असता, दीपक सिंग याचे नाव समोर आले.

विक्रोळी परिसरात तो असल्याची माहिती मिळताच, अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी पहाटे ६ वाजता त्या भागात सापळा रचला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये ४० हजारांचे चरस, वजनकाटा आणि प्लॅस्टिक पिशव्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आतापर्यंत ३४ तस्करांना बेड्या
पंजाबमधून ट्रक आणि रेल्वेमार्गे महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी आतापर्यंत सहा वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या साखळीचा तपास करताना आतापर्यंत एकूण ३४ संशयितांना अटक करण्यात आली असून, सहा कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

Pimpalgaon Rescue: पिंपळगाव-खडकीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने थरारक सुटका

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

SCROLL FOR NEXT