रस्त्यांअभावी रुग्णांचे हाल
शाहापूरमध्ये महिलेला झोळीतून रुग्णालयात नेले
शहापूर, ता. ३ (वार्ताहर)ः तालुक्यात मूलभूत सुविधेची कायम वानवा भासत असते. येथील वाड्यावस्त्यांना आजही रस्त्यांअभावी झगडावे लागत आहे. वरसवाडीतील एका आजारी महिलेला खडतर पायवाटेने चादरीच्या झोळीतून रुग्णालयात न्यावे लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे रस्त्याच्या मूलभूत सुविधेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
कसारा घाटातील अत्यंत दुर्गम वरसवाडीतील मंदा श्रवण आघाण (वय ३८) ही महिला काही दिवसांपासून आजारी होती. गुरुवारी (ता.२) तिची शुद्ध हरपून प्रकृती आणखीनच बिघडली. तिला रुग्णालयात नेण्यासाठी गावकऱ्यांनी धावपळ केली, परंतु खडतर पायवाटेशिवाय पक्का रस्ता नसल्याने गावात रुग्णवाहिका येण्याची सोय नव्हती. अखेर या महिलेला चादरीच्या झोळीतून तीन किमी अंतर चालून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आले. पुढे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मागणीकडे दुर्लक्षच
रस्त्याच्या मूलभूत सुविधेअभावी येथील रुग्णांना अनेकदा वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यातून बऱ्याचदा रुग्णाचा जीवदेखील जातो. वरसवाडीला कायमस्वरूपी पक्का रस्ता मिळावा म्हणून गावकरी अनेक वर्षे मागणी करीत आहेत. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले आहे. परिणामी रुग्णांना झोळीतून रुग्णालयात नेण्याची वेळ येथील गावकऱ्यांवर येत आहे. हीच परिस्थिती पावसाळ्याच्या दिवसांत आणखी गंभीर बनते, असे वरसवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.