वाघबीळमध्ये संस्कृतीचे नवे दालन
‘आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ कलेला देणार नवी झेप
ठाणे, ता. ३ : कला आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा जपणाऱ्या ठाणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात लवकरच एका भव्य आणि अत्याधुनिक नाट्यगृहाची भर पडणार आहे. घोडबंदर रोडवरील वाघबीळ परिसरात साकार होणारे ‘आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ हे ठाण्याच्या सांस्कृतिक जीवनाला नवी उंची देणारे महत्त्वाचे केंद्र ठरेल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात मध्यवर्ती भागात ‘राम गणेश गडकरी रंगायतन’ आणि हिरानंदानी परिसरात ‘डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह’ कार्यरत आहे. आता घोडबंदर पट्ट्यातील रसिक आणि कलाकारांच्या सोयीसाठी वाघबीळ येथे हे तिसरे भव्य नाट्यगृह उभारले जात आहे. सुमारे सात हजार ३०० चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प राज्यातील महत्त्वाच्या रंगमंचांपैकी एक ठरणार आहे.
हिरवळ आणि आकर्षक सुशोभीकरणामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. केवळ पायाभूत सुविधा उभारणे हा उद्देश नसून, ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम करण्याचा हा प्रयत्न आहे. स्थानिक रंगकर्मी, दिग्दर्शक आणि उदयोन्मुख कलाकारांना या प्रकल्पामुळे सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. वाघबीळ येथील हे नाट्यगृह ठाण्याच्या सांस्कृतिक विश्वातील एक नवे पर्व ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अत्याधुनिक सुविधा आणि भव्यता
आसनक्षमता : या नाट्यगृहात सुमारे दोन हजार ५०० प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असेल.
रंगमंच : भव्य नाट्यप्रयोगांसाठी उंच आणि प्रशस्त रंगमंच तसेच अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था उपलब्ध असेल.
सांस्कृतिक प्लाझा : नाट्यगृहाच्या परिसरात एक प्रशस्त प्लाझा उभारला जाणार असून, तिथे विविध उत्सव, लाइव्ह सादरीकरणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुला अवकाश मिळेल.
समावेशकता : दिव्यांगांसाठी विशेष सोयीसुविधा आणि प्रेक्षकांसाठी आरामदायी आसनरचना याला प्राधान्य देण्यात आले आहे.
कलाकारांसाठी सोयी : सुसज्ज बॅकस्टेज, स्वतंत्र प्रवेशमार्ग आणि ग्रीन रूम्समुळे कलाकारांची मोठी सोय होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.