मुंबई

माथेरानमध्ये सेमी इंग्रजी शिक्षणाची नवी दिशा

CD

माथेरानमध्ये सेमी इंग्रजी शिक्षणाची नवी दिशा
वीर कोतवाल शाळेत पहिलीपासून वर्ग सुरू होणार
कर्जत, ता. ३ (बातमीदार) ः माथेरान नगर परिषदेच्या वीर कोतवाल शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गुरुवारी (ता. ३) झालेल्या शिक्षक-पालक सभेत हा निर्णय घेतला. यामुळे मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे दर्जेदार ज्ञान मिळवण्याचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
समिती सदस्य प्रतिभा घावरे यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची माहिती पालकांनी वेळोवेळी घेत राहावी आणि मुलांमधील गुणवत्तेला योग्य संधी द्यावी, असे सांगितले. इंग्रजी माध्यमाबाबत वाढत्या आकर्षणामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याची बाब लक्षात घेता, सेमी इंग्रजी हा उत्तम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास शिक्षण सभापती सुनील शिंदे यांनी व्यक्त केला. यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक केली जाणार असून, पहिलीपासूनच सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
या सभेला शिक्षण सभापती सुनील शिंदे, समिती सदस्य प्रतिभा घावरे, केतन रामाने आणि सुरेखा साळुंखे उपस्थित होते. मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षक सचिन भोईर यांनी पालकांना मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षक लक्ष्मण ढेबे, साक्षी कदम, अमोल अंधारे आणि मनीषा चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तशीरपणाबाबत पालकांनी जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली.

शाळेचा चेहरामोहरा बदलणार
मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्गात स्मार्ट डिजिटल बोर्ड, विविध शैक्षणिक साधने आणि स्वच्छ स्वच्छतागृहे यामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे. मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांनी पालकांना आपल्या मुलांचा प्रवेश मराठी माध्यमाच्या शाळेत घेण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Interfaith Blood Donation: बकरी ईद निमित्त मशिदीत सर्वधर्मीयांचे रक्तदान; ‘मानवता हाच खरा धर्म’चा संदेश

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT