गोळीबार प्रकरणातील दोघांना
तीन दिवसांची पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ ः मुंब्रा येथे वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. दोघे जखमी झाल्याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या जयन शिवानंदन नायर (वय ५१) आणि त्याची मानलेली बहीण अन्नू शेख यांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना शुक्रवारी ठाणे न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंब्र्यात गुरुवारी गोळीबारात अकबर अब्दुल शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तक्रारदार अब्दुल हसन शेख आणि समीर अहमद शेख हे गंभीर जखमी झाले होते. अब्दुल शेख याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मुंब्रा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पसार झालेल्या नायर आणि त्याच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली. ते दोघे कोलकाता येथील मूळ रहिवासी असून ते मुंब्र्यात वास्तव्यास आहेत. पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्या माहितीनुसार, शाळेच्या आवारातील केळीच्या झाडावरून वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.