मुंबई

मच्छीमारीवरील डिझेल दरवाढ कायमच !

CD

सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली
केंद्रीय मंत्र्यांचा दिलासा देण्यास नकार; मच्छीमार संतप्त
मुरूड, ता. ३ (बातमीदार) ः युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलदरात कपात करणे किंवा कोणताही दिलासा देणे सध्या शक्य नसल्याचा निर्वाळा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला दिला आहे. या भूमिकेमुळे मच्छीमार संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली, अशी तीव्र भावना व्यक्त केली.
डिझेल दरवाढीने मुरूड तालुक्यातील राजपुरी, एकदरा आणि मुरूड समुद्रकिनारी सुमारे ९० टक्के बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत. यामुळे मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तातडीने अनुदान, सवलतीचे डिझेल किंवा आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी राज्य मच्छीमार संघटनेचे माजी अध्यक्ष विजय गिदी यांनी केली आहे. मच्छीमार सहकारी संस्थांना घाऊक ग्राहक श्रेणीत धरले जात असल्याने त्यांना सामान्य ग्राहकांपेक्षा अधिक दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. या श्रेणीतून वगळण्याची मागणी गिदी यांनी केली आहे.

अनुदानाची मागणी
मुरूड तालुक्यातील दादली पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांकडे एक नाखवा व दिमतीला १५ खलाशी यांच्या राशन पाण्याची १० दिवसांची करावी लागणारी बेगमी, बर्फ, डिझेल, पिण्याचे पाणी आदीचा खर्च ७० ते ८० हजारांपर्यंत जातो. मात्र, त्या प्रमाणात मासे गवसत नसल्याची खंत सागर कन्या मच्छीमार सोसायटीचे व्हाइस चेअरमन मनोहर मकू यांनी बोलून दाखवली. मच्छीमारांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT