मुंबई

चिंचघर येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाचा शुभारंभ

CD

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेला सुरुवात

वाडा, ता. ३ (बातमीदार) : वाडा तालुक्यातील चिंचघर गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायतमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या वतीने या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता व बालकांचे आरोग्य निरोगी राखणे, स्वच्छताविषयक उपक्रम राबविणे, साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखणे या उद्देशाने बुधवार (ता.१) पासून पुढील वर्षभर संपूर्ण राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती व आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर करोडो रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहेत. यासाठी त्या-त्या स्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.
वाडा तालुक्यातील चिंचघर गावात ग्रामपंचायतच्या वतीने नुकताच या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, या वेळी झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांना या अभियानाची कल्पना देऊन शासन निर्णयाचे वाचन व स्पष्टीकरण करण्यात आले. तसेच क्षयरोगमुक्त भारत अभियान २.० अंतर्गत गावातील १४ वर्षांवरील ग्रामस्थांच्या छातीचे मोफत एक्स-रे काढण्यात आले, तसेच लर्निंग लिंक फाउंडेशन व मोतीलाल ओसवाल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांचे आयुष्मान गोल्ड काढण्यासाठी मोफत कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये सुमारे १०० च्या वर नागरिकांचे आयुष्मान कार्ड काढून देण्यात आले. या कार्डमुळे नागरिकांना सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची संधी उपलब्ध होणार आहे.
ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित या कार्यक्रमांना सरपंच प्रेमा नांगरे, माजी उपसरपंच मनेश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी पंढरीनाथ सासे, ग्रामपंचायत सदस्य संगीता भोईर, नीलिमा ठाकरे, अर्चना भोईर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रुशाली पाटील, आरोग्य विभागाचे कर्मचारी व लर्निंग लिंक्स फाउंडेशनचे हर्षल थाले, सायली पाटील व प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT