मुंबई

उपमुख्यमंत्र्यांना डावलल्याने शिवसेना आक्रमक

CD

तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अनेकवेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही कार्यक्रम पत्रिकेत नाव टाकण्यात येत नाही. या प्रकाराचा निषेध करीत शिवसेनेचे नगरसेवक साहिल देविदास चौगुले आक्रमक झाले आहेत. सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाच्या गुरुवारी (ता. ३) पार पडलेल्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री शिंदेंचे नाव नसल्याने चौगुले आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी पालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करीत शिंदेंच्या नावाचा फलक उद्‍घाटनस्थळी लावला. राज्यात महायुतीत दिलजमाई असली तरी नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने येणार असल्याचे दिसत आहे.

नगरसेवक साहिल चौगुले म्हणाले की, महापालिकेच्या माध्यमातून ७ मार्चला झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव टाकण्यात आलेले नव्हते. इतकेच नाही, तर आजवर झालेल्या भूमिपूजन, नागरी कामांचे उद्‍घाटन कार्यक्रमात महापालिकेने शिंदे यांचे नाव टाकलेले नाही. मात्र, दुसरीकडे ऐरोलीचे आमदार, वनमंत्री गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नसतानाही त्यांचे नाव विषय पत्रिकेत टाकून त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे उद्‍घाटन केले जाते. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांची नावे टाकली जातात. त्यांचा कार्यक्रमात सन्मान केला जातो, परंतु नवी मुंबईत सुरू असणारा प्रकार केवळ कुरखोडी करण्याचा असून, प्रशासन दबावापोटी काम करत असल्याचे नगरसेवक चौगुले म्हणाले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी सेक्टर-१७ येथे पाम बीच मार्गावरून पुण्याकडे जाण्याकरिता सायन-पनवेल महामार्गापर्यंत उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या विषय पत्रिकेबरोबरच कोनशिलेमध्ये शिंदे यांचे नाव नसल्याने, तसेच त्यांना निमंत्रण न दिल्याने चौगुले यांनी आंदोलन करीत त्यांच्या नावाचा फलक उभारला. प्रशासनाने आपला कारभार वेळीच सुधारावा, अन्यथा शिवसेना अधिक आक्रमक होईल, असा इशारा चौगुले यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavitran Transfers: महावितरणात ‘ऑपरेशन ट्रान्सफर’! राज्यभरातील १६ अधीक्षक अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या; कारण काय?

SRH vs RCB : हेनरिच क्लासनचा मोठा पराक्रम! अभिषेक, इशानसह आतषबाजी; उभारली IPL 2026 मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या

NEET Paper Leak Pune: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मुख्याध्यापिका मनीषा हवालदार निलंबित; सीबीआयची कारवाई

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT