पावसाळ्यात दरडींचा धोका टाळण्यासाठी
संरक्षक भिंती बांधण्यास सुरुवात
खासदार निधीचा वापर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः पावसाळ्यात दरड कोसळणे किंवा जीर्ण संरक्षक भिंती ढासळून दुर्घटनेचा धोका असतो. त्यात जीवित आणि वित्तहानी होते. हे टाळण्यासाठी पूर्व उपनगरात संरक्षक भिंती बांधण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या खासदार निधीचा वापर करण्यात येत आहे.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या खासदार निधीतून धोकादायक व जीर्ण झालेल्या संरक्षक भिंतींच्या पुनर्बांधणीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत घाटकोपर पश्चिम येथील शाखा क्र. १२३ परिसरातील श्रीराम सोसायटी व श्री काळभैरव सोसायटी, पार्क साईट येथे दोन ठिकाणी संरक्षक भिंतींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. हे भूमिपूजन शिवसेनेचे विभागप्रमुख सुरेश पाटील व नगरसेवक सुरेश मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील उपस्थित होत्या. तसेच भांडुप येथील शाखा क्र. ११६, कांबळे कंपाउंड परिसरातही संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे ३० वर्षांपूर्वी याच ठिकाणी खासदार पाटील यांच्या मातोश्री स्व. मनोरमा पाटील या नगरसेविका असताना त्यांच्या निधीतून ही भिंत उभारण्यात आली होती. संरक्षक भिंतींच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे; मात्र आता या कामामुळे पावसाळ्यात भिंत कोसळून होणाऱ्या दुर्घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.