मुंबई

तळोजावासियांची सिलिंडर नोंदणीपासून सुटका

CD

तळोजावासीयांची सिलिंडर नोंदणीपासून सुटका
महानगर गॅसची थेट घरपोच पीएनजी जोडणी
खारघर, ता. ३ (बातमीदार) : तळोजा वसाहतीतील नागरिकांना लवकरच एलपीजी सिलिंडर नोंदणी व प्रतीक्षेच्या त्रासातून दिलासा मिळणार असून एप्रिल अखेरपर्यंत पाइपद्वारे थेट घरात ‘पाइप्ड नॅचरल गॅस’ जोडणी उपलब्ध होणार आहे. सेक्टर २, १० आणि ११ या भागांमध्ये महानगर गॅसकडून ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
महानगर गॅस कंपनीने खारघरमधील काही भागांत यापूर्वीच पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा सुरू केला आहे. त्यानंतर सुमारे तीन वर्षांपूर्वी तळोजा वसाहतीतही प्रकल्प हाती घेण्यात आला. सेक्टर २ आणि १० मध्ये अनेक सोसायट्यांपर्यंत गॅसवाहिन्या टाकण्यात आल्या; मात्र सिडको व स्थानिक प्रशासनाकडून खोदकाम परवानगी न मिळाल्याने पुढील काम रखडले होते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंधन पुरवठ्यातील अनिश्चितता लक्षात घेता शासनाने पीएनजी प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिल्यानंतर या रखडलेल्या कामाला वेग आला आहे. नुकतीच पालिकेकडून गॅसवाहिनी खोदकामास परवानगी मिळाल्याने सेक्टर ११ मधील कामालाही सुरुवात झाली असून, काम पूर्ण होताच संबंधित परिसरातील घरांमध्ये थेट गॅस पुरवठा सुरू केला जाणार आहे.
महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आवश्यक पायाभूत सुविधा उभारणी अंतिम टप्प्यात असून, एप्रिल अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणावर घरगुती जोडण्या दिल्या जातील.

चौकट :
वाढती वसाहत, वाढती गरज
तळोजा वसाहतीत नव्याने वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या कळंबोली आणि खारघर येथील विविध गॅस एजन्सीकडून सिलिंडर पुरवठा केला जातो. मात्र, आता महानगर गॅसकडून थेट घरात PNG जोडणी मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोट :
मुंबई, ठाणे, पनवेलसह विविध भागांत खोदकाम परवानग्यांमुळे कामात अडथळे येत होते. मात्र, शासनाच्या निर्देशांनंतर स्थानिक प्रशासनाने परवानग्या देण्यास गती दिली आहे. त्यामुळे तळोजा वसाहतीत लवकरच घरोघरी पीएनजी गॅसजोडणी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत
- नीरा अस्थाना-फाटे,
महाव्यवस्थापक (कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, महानगर गॅस लिमिटेड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT