मुंबई

राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुखदीप सिंग यांना कांस्यपदक

CD

राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुखदीप सिंग यांना कांस्यपदक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या वतीने पुणे येथे आयोजित ‘राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत पनवेलच्या शरीरसौष्ठवपटू सुखदीप सिंग उभी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे.
पुरुष गटातील क्लासिक फिजिक्स (१८० सें.मी. पेक्षा जास्त उंची) या गटात देशभरातील नामांकित आणि अनुभवी खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली. आकर्षक व संतुलित शरीरयष्टी, उत्कृष्ट मसल डेफिनिशन तसेच आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाच्या जोरावर सुखदीप सिंग उभी यांनी परीक्षकांची मने जिंकत तिसरे स्थान मिळवले. त्यांच्या या यशामुळे पनवेल शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तसेच मागील महिन्यात पनवेलमध्ये झालेल्या महाराष्ट्र श्री (आमदार चषक) २०२६ स्पर्धेत ९० किलो गटात सुखदीप यांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते.
सुखदीप सिंग उभी यांच्या या यशामागे त्यांचा कठोर व सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध आहारपद्धती आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. ते खांदा कॉलनी येथील टायसो फिटनेस जिममध्ये नियमित सराव करत असून त्यांना प्रशिक्षक निलेश दगडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे पदक त्यांच्या मेहनतीचे फलित असून, त्यांच्या या यशामुळे पनवेल परिसरात तसेच क्रीडावर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव तथा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांनी सुखदीप सिंग उभी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना सुखदीप सिंग उभी म्हणाले, “हे यश माझ्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे, कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे शक्य झाले. भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा माझा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT