मुंबई

कुक्कुटपालनातून शेतकऱ्याची भरारी

CD

वाणगाव, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत वाणगाव परिसरातील कोलवली गावात प्रगतशील शेतकरी अनिल पाटील यांनी गावठी कुक्कुटपालनाचा यशस्वी प्रयोग उभारला आहे. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी शाश्वत पिकांकडे वळत असताना, दुसरीकडे मत्स्यपालन, शेळीपालन, पशुपालन यांसारख्या पूरक व्यवसायांनाही चालना मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी सेंद्रिय शेतीसोबत गावठी कोंबड्यांचे संगोपन सुरू करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण केले आहेत.
बाजारात गावठी अंडी आणि मांस याची प्रचंड मागणी पाहता सेंद्रिय शेतीसह आणि पशुपालन व्यवसायाच्या जोडीला गावठी कोंबडी संगोपन करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला आहे. सध्या त्यांच्या शेतात १०० गावठी कोंबड्यांचे संगोपन केले जाते. एका कोंबडीकडून वर्षाकाठी सरासरी ८० अंडी मिळतात. ५० कोंबड्यांपासून सुमारे चार हजार अंडी उत्पादन होते. एका अंड्याला सरासरी १५ रुपये दर मिळाल्यास वार्षिक सुमारे ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. याशिवाय, जिवंत कोंबड्यांची विक्रीही फायदेशीर ठरते. सरासरी एक किलो वजनाचा कोंबडा ५०० रुपयांना विकला जातो. ५० कोंबड्यांच्या विक्रीतून सुमारे २५ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.

नैसर्गिक पद्धतीने संगोपन
कोंबड्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दर १५ दिवसांनी हळद, मीठ आणि गुळ पाणी दिले जाते. तसेच कोथिंबीर, मुळा यांसारखा हिरवा चारा दिल्याने कोंबड्यांची वाढ चांगली होते. मोकळ्या वातावरणात संचार केल्यामुळे या कोंबड्या अधिक तंदुरुस्त राहतात.

-----
पशुधन संरक्षणातही मदत
गाई-गुरांच्या गोठ्याशेजारी कोंबड्यांचा फार्म असल्याने गोचीडसारख्या किडींना कोंबड्या खातात. त्यामुळे जनावरांचे संरक्षण होते आणि गोठ्यामध्ये जंतुनाशक व इतर औषधांची फवारणी करावी लागत नाही. गावठी कोंबड्या गाईगुरांचे संरक्षण करत आहेत.

----
कोंबडी खत शेतीसाठी उत्तम
कोंबड्यांची विष्ठा हे शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खत आहे. शेतीमध्ये याचा चांगला फायदा होतो. गावठी कोंबड्यांच्या संगोपनासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज नसल्याने कमी जागेत कमी खर्चात अपेक्षित उत्पादन साध्य होते.
-----
महिलांनीही पूरक व्यवसाय म्हणून परसबागेत गावठी कोंबड्यांचे संगोपन केल्यास घर संसाराला हातभार लागेल. ग्रामीण भागातील शेतकरी महिला आणि युवक वर्गाने शेतीला जोडधंदा म्हणून गावठी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केल्यास कुटुंबाला आर्थिक बळ मिळू शकेल.
- अनिल पाटील, प्रगतशील शेतकरी, कोलवली, वाणगाव

वाणगाव : ग्रामीण भागात कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT