मुंबई

ज्येष्ठ निर्माते ए. कृष्णमूर्ती यांचे निधन

CD

ज्येष्ठ निर्माते ए. कृष्णमूर्ती यांचे निधन
मुंबई, ता. ३ : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते ए. कृष्णमूर्ती यांचे शुक्रवारी (ता. ३) वांद्रे पाली हिल येथील निवासस्थानी श्वसनाच्या त्रासाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. चित्रपटसृष्टीतील योगदानासोबतच, निधनानंतर स्वतःचे शरीर वैद्यकीय अभ्यासासाठी दान करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.

ए. कृष्णमूर्ती यांनी सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वीच आपला देह सायन येथील के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेजला दान करण्याचा संकल्प केला होता. त्यांचा मुलगा रविशंकर यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘माझ्या वडिलांनी १० वर्षांपूर्वीच देहदानाचा संकल्प केला होता. ही त्यांची वैयक्तिक इच्छा होती. विशेष म्हणजे, माझ्या आईनेही वडिलांसोबतच देहदानाचा फॉर्म भरला असून, त्यांनी मिळून हा निर्णय घेतला होता.’ ए. कृष्णमूर्ती यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचे नाव प्रामुख्याने ‘घर एक मंदिर’, ‘सिंदूर’, ‘हिम्मतवाला’, ‘आग’, ‘मेरे दो अनमोल रतन’ आणि ‘चरणों की सौगंध’ यांसारख्या चित्रपटांशी जोडले गेले. चित्रपट निर्मितीसह त्यांनी ‘अळगरसामियिन कुथीराई’ आणि ‘यारुक्कू थेरियम’ यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांत अभिनयही केला. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एक शिस्तबद्ध निर्माता आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT