मुंबई

शिगाव जवळ एसटी बसच्या धडकेत दुचाकी वरील दोघांचा मृत्यू एक जण जखमी.

CD

एसटी बसच्या धडकेत
दोघांचा मृत्यू; एक जण जखमी
तारापुर, ता. ३ (बातमीदार) ः एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना बोईसरजवळील शिगाव येथे घडली. बोईसर-शिगाव ऐना मार्गावर बसला ओव्हरटेक करताना चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बोईसर शिगाव ऐना मार्गावर एसटी बस आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील शरद घाटाळ (३०) आणि अनिकेत कामडी (१८) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात विराज कामडी हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ऐना येथून बोईसरकडे येणाऱ्या एसटी बसला खानिवडे येथील वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी घसरली. यामध्ये दुचाकीवरील दोन तरुण बसच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा तरुण बाजूला फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. मृत आणि जखमी तरुण हे शिगाव येथील रामपाडा येथे राहणारे असून, गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी एसटी बसचालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. या अपघातप्रकरणी बोईसर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT