मुंबई

गौण खनिजाची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

CD

गौण खनिजाची बेकायदा वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल


भिवंडी, ता. ३ (वार्ताहर) ः रेतीची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या रेतीमाफियाच्या विरोधात कोपर ग्राम महसूल अधिकारी रमेश रामराव सूर्यवंशी यांनी त्यांच्या पथकासह कारवाई केली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात रमेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून रेतीची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल्हेर, कशेळी, कोपर गावातून गौण खनिजाचे अवैधपणे उत्खनन आणि वाहतूक होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी संबंधित रेतीमाफियांवर कारवाईचे आदेश संबंधित महसूल विभागाला दिले. त्या अनुषंगाने कोपर ग्राम महसूल अधिकारी रमेश रामराव सूर्यवंशी हे ग्राम महसूल अधिकारी पालखने मनोज नवले, ग्राम महसूल अधिकारी जुनांदुर्खी रुपेश कारभारी, ग्राम महसूल अधिकारी चिंबिपाडा किसन हांबीर असे पथकासह बुधवारी कोपर गावातील दोस्ती ग्रेटर ठाणे येथे १ एप्रिलला गस्त करीत असताना पथकाला केवणी गावाकडून भिवंडी ठाणे मुख्य रस्त्याकडे रेतीने भरलेला ट्रक जात असताना दिसला. चालक मनोज याच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


त्या वेळी महसूल पथकाने चालकाला रेतीची कायदेशीरपणे वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगितले. मात्र, चालकाने महसूल अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून घटनास्थळावरून टेम्पोची चावी घेऊन पलायन केले आहे. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी रमेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून चालक मनोज याच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी ट्रकसह अवैधपणे वाहतूक केली जाणारी रेती असा १५ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर महसूल विभागाच्या या कारवाईने अवैधपणे गौण खनिजाची चोरी करणाऱ्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली असून, महसूल विभागाकडून अशा रेतीमाफियांवर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी रमेश सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT