भंगारने भरलेला कंटेनर उलटला
भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) ः तालुक्यातील वळपाडा परिसरात कंटेनर उलटला. मानकोली येथून अंजूर चौकाच्या दिशेने जात असलेला लोखंडी पाइप स्क्रॅपने (भंगार) भरलेला कंटेनर एका वळणावर आला असता, चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने वळणावर उलटला. यात चालकाला दुखापत झाली नाही; परंतु या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच नारपोली वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर रस्त्यावरून हटविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.