मुंबई

पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा

CD

पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा
शालेय शिक्षण विभागाकडून सुधारित आदेश जारी
मुंबई, ता. ४ : शिक्षक भरतीच्या निवडीसाठी उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. या उमेदवारांना त्यांच्या सोईनुसार जास्तीत जास्त एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहेत. यासाठी शालेय शिक्षण विभागाने सुधारित आदेश जारी केले आहेत.

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीच्या निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड आणि नियुक्ती करता यावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाने हे बदल केले आहेत. यात मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबविणे आवश्यक राहील. तसेच यात सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण १०० गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे बंधनकारक असेल. यात उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील तर अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे अशा उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवारांचे वय देखीलसारखे असल्यास इयत्ता १२वीचे गुण विचारात घेतले जाणार आहेत. यासाठी गुणांकन आणि उमेदवारांच्या निवडीला मान्यता देण्याचे अधिकार संबंधित शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्याचीही सुधारणा करण्यात आली आहे.

सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध
मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोईनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण १०० प्राधान्यक्रम तसेच सोयीनुसार ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT