आधार कार्ड नसल्याने प्रवेश नाकारला!
कल्याणमध्ये जेईई परीक्षा हुकल्याने तरुणीचा संताप
कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : कल्याणमध्ये जेईईची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर आर. एन. नेत्रा ही तरुणी पोहोचली; मात्र तिला आधार कार्डचे कारण देत परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे तिची परीक्षा हुकली. याबाबत तिच्या आईसह अन्य पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आर. एन. नेत्राची परीक्षा हुकल्याने तिचा दोन वर्षांचा अभ्यास वाया जाणार आहे. तिचे झालेले शैक्षणिक नुकसान कोण भरून देणार, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे; मात्र परीक्षा केंद्र प्रमुखांनी ती परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकली नसल्याने तिला परीक्षा केंद्राच्या आत घेतले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कल्याण पूर्वेतील कमलादेवी विद्यालय या शाळेत जेईईचे परीक्षा केंद्र होते. ही परीक्षा देण्यासाठी आर. एन. नेत्रा ही सकाळी ८ वाजताच पोहोचली होती; मात्र तिला केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी त्याठिकाणी सुरक्षा रक्षकांसह केंद्र अधिकारी वर्गाने कागदपत्रांची मागणी केली. तिच्याकडे आधार कार्ड मागण्यात आले. तिच्याकडे मूळ आधार कार्ड नव्हते. तिच्याकडे मूळ आधार कार्डाची छायांकित प्रत मागण्यात आली. तिने तिच्या आजीला बोलावून घेतले. तिला छायांकित प्रत आणण्यासाठी पाठविले. आजी छायांकित प्रत घेऊन आली; मात्र परीक्षा केंद्रावरील प्रमुखांनी वेळ संपल्याचे सांगत तिला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला.
आर. एन. नेत्राने सांगितले, की मी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचली होती. तिच्याकडे आधार कार्डची छायांकित प्रत मागितली, ती दिली. तरीदेखील मला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही. वेळेसंदर्भात परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत. याबाबत पोलिसांकडे मदतही मागितली; मात्र पोलिसांनी दाद दिली नसल्याचे तिने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.