मुंबई

शिवसेनेतून भाजपत आलेल्या मिलिंद गान यांची भाजप अंबरनाथ शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

CD

मिलिंद गान यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती

अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) ः शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख म्हणून प्रदीर्घ काळ कार्यरत राहिलेले अनुभवी नेते मिलिंद गान यांची आता भाजपच्या अंबरनाथ शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१७ वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये सक्रिय राजकीय आणि सामाजिक कार्य करणाऱ्या गान यांनी नगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ​मिलिंद गान यांच्या या निवडीबद्दल भाजप संपर्क कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी भाजप राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले-पाटील, नगरसेवक विश्वजित करंजुले-पाटील आणि भाजप गटनेते अभिजित करंजुले-पाटील यांनी गान यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गान यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रभावी ठरेल, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला. ​याप्रसंगी संतोष शिंदे, भाजप शहर सरचिटणीस दिलीप कणसे, सर्जेराव माहुरकर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिलिंद गान यांनीही आपल्यावरील विश्वासाबद्दल पक्षाचे आभार मानले असून, शहराच्या विकासासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT