मुंबई

पंजाब ट्रिपनंतर ठाणेकराला धक्का

CD

कौटुंबिक सहलीनंतर पत्नीचे पलायन
साडेतीन लाखांचा ऐवज घेऊन अमृतसरमध्ये स्थायिक
ठाणे, ता. ५ : कौटुंबिक सहलीसाठी पंजाबला गेलेल्या ठाण्यातील एका व्यावसायिकाला मोठा धक्का बसला आहे. त्यांची पत्नी, मुलगा आणि सासूने घरातील सुमारे ३.३० लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला असून, ते आता अमृतसरमध्ये एका रिक्षाचालकासोबत स्थायिक झाल्याचे समोर आले आहे. या विचित्र घटनेमुळे ढोकाळी परिसरात खळबळ उडाली आहे.

ठाण्यातील ढोकाळी भागात राहणारे ४५ वर्षीय तक्रारदार हे कपड्यांचे ट्रेडिंग आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. डिसेंबर २०२३ मध्ये ते आपल्या कुटुंबासह अमृतसरला फिरायला गेले होते. तिथे त्यांची ओळख हरविंदर सिंग नावाच्या एका स्थानिक रिक्षाचालकाशी झाली. सहल संपवून सर्व जण ठाण्यात परतले; मात्र त्यानंतर १० जानेवारी २०२६ रोजी पत्नी, मुलगा आणि सासू अचानक घरातून बेपत्ता झाले. सुरुवातीला कापूरबावडी पोलिस ठाण्यात ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली होती; मात्र तपासादरम्यान पोलिसांना आढळले की तक्रारदाराची पत्नी अमृतसरमध्ये त्याच रिक्षाचालकासोबत (हरविंदर सिंग) आपल्या मुलासह स्वखुशीने राहत आहे. हे समजल्यानंतर पोलिसांनी ‘मिसिंग’ची फाइल बंद केली.

साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंब सोडून जाताना पत्नीने घरातील कपाट साफ केले आहे. यामध्ये १.३० लाख रुपयांची रोख रक्कम, ७५ हजारांची सोन्याची चेन आणि २५ हजारांची अंगठी, तसेच एक लाख रुपयांचा रेडिमेड कपड्यांचा साठा असा एकूण तीन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पत्नीने पलायन केले आहे. याप्रकरणी आता कापूरबावडी पोलिस ठाण्यात चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT