मुंबई

वेदमूर्ती देवव्रत रेखे यांचा कल्याणमध्ये गौरव

CD

वेदमूर्ती देवव्रत रेखे यांचा कल्याणमध्ये गौरव
मनाची एकाग्रता हीच यशाची गुरुकिल्ली; वैदिक परंपरा जपण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी शुक्ल यजुर्वेदातील सुमारे दोन हजार मंत्रांचे निर्दोष मौखिक दंडक्रम पारायण करणाऱ्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचा कल्याणमध्ये सत्कार करण्यात आला. या वेळी ‘मन एकाग्र असेल तरच कोणतीही साधना यशस्वी होते’, असे प्रतिपादन स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

कल्याणमधील सी. एम. गांधी सभागृहात आयोजित या सोहळ्यास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. याज्ञवल्क्य संस्था, अखिल भारतीय ब्राह्मण संघ (कल्याण शहर), ब्राह्मण सभा, चित्पावन ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आपल्या भाषणात बुद्धीचा योग्य उपयोग, उपासनेचे महत्त्व आणि गायत्री उपासनेची आवश्यकता यावर विशेष भाष्य केले. त्यांनी देवव्रत रेखे यांच्या विक्रमाचे कौतुक करत एकाग्रतेच्या शक्तीवर भर दिला. कार्यक्रमात वेदमूर्ती महेश रेखे यांनी ‘दंडक्रम पारायण’ या कठीण वैदिक परंपरेचे स्वरूप स्पष्ट केले. यानंतर देवव्रत रेखे यांनी मंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

एक श्लोक म्हणण्याचे आवाहन
पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी वैदिक परंपरा जपण्यासाठी दररोज किमान एक श्लोक म्हणण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशीष दामले उपस्थित होते. या वेळी देवव्रत रेखे यांना महावस्त्र, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, मानपत्र आणि एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दांडेकर दाम्पत्यांनी भक्तिगीते सादर केली. तर ब्रह्मवृंदांनी मंगलाचरण व शंखनादाने मान्यवरांचे स्वागत केले. शांती मंत्र पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली. विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT