मुंबई

टिटवाळ्यात गॅससाठी जनतेची धावपळ

CD

टिटवाळ्यात सिलिंडरसाठी धावाधाव
दोन दिवसांपासून पहाटेपासून रांगा; गॅससाठी मजुरीवर पाणी
टिटवाळा, ता. ५ (वार्ताहर) : घरगुती गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईचा फटका आता टिटवाळ्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. टिटवाळा पश्चिमेकडील वासुंद्री रोडवर गेल्या दोन दिवसांपासून गॅससाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, नागरिकांना आपला रोजचा रोजगार सोडून पहाटेपासून ताटकळत उभे राहावे लागत आहे.

जानकी विद्यालयाजवळील गणेश प्रतिमा चौक परिसरात भारत गॅस कंपनीच्या वितरणकेंद्राबाहेर हे विदारक चित्र दिसत आहे. अनेक नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सकाळी सहा वाजल्यापासूनच रांगेत उभे राहत आहेत. मात्र, दुपार उलटून गेली तरी सिलिंडर हाताला लागेल याची खात्री नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या टंचाईमुळे केवळ वेळेचाच अपव्यय होत नसून, हातावर पोट असणाऱ्या कामगार आणि छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सिलिंडर मिळवण्यासाठी कामावर दांडी मारावी लागत असल्याने अनेकांच्या रोजच्या मजुरीवर पाणी फेरले जात आहे.

वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
ऑनलाइन बुकिंग करूनही वेळेवर सिलिंडर घरपोच मिळत नाही, त्यामुळे प्रत्यक्ष केंद्रावर येऊन रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय उरत नाही, अशी तक्रार नागरिक करत आहेत. वितरण प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत, ‘‘बुकिंगची व्यवस्था नेमकी कुठे अडकते?’’ असा सवाल संतप्त ग्राहकांनी उपस्थित केला आहे.

वाहतुकीची कोंडी
रस्त्यावरच सिलिंडरच्या रांगा लागल्याने वासुंद्री रोडवरील वाहतुकीवरही परिणाम होत आहे. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना अशा प्रकारे रस्त्यावर उभे राहावे लागणे हे प्रशासनाचे अपयश आहे. गॅस वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत न झाल्यास नागरिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Pune: तरुणीला पाहत भररस्त्यात हस्थमैथून, तरुणाचं अश्लील कृत्य कॅमेरात कैद; संतापजनक प्रकाराने पुण्यात खळबळ

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड; मनिषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी सीबीआय न्यायालयात हजर

SCROLL FOR NEXT