चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची दगडाने ठेचून हत्या
श्रीवर्धन, ता. ५ (वार्ताहर) ः श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे चारित्र्याच्या संशयवरून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी (ता. १) दुपारी ३ दरम्यान घडली आहे. याप्रकरणी दिघी सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी किरण वाघमारे याला ताब्यात घेतले आहे.
दिघी येथील जैद जलील अहमद गझली यांच्या आंबा बागेत काम करणारे अनिता वाघमारे व तिचा पती किरण वाघमारे यांचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या वेळी अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत किरणने तिला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. अनिताला रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी जैद जलील अहमद गझली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीवर्धन उपविभागीय पोलिस अधिकारी सविता गर्जे आणि दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष आवटी यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.