मुंबई

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर क्रिकेटचा जल्लोष

CD

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर क्रिकेटचा थरार
प्रेसिडेंट कपमध्ये कलाकार, पालिका अधिकाऱ्यांची फटकेबाजी
ठाणे, ता. ५ (बातमीदार) : शहरातील ऐतिहासिक दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सध्या प्रेसिडेंट कप इंडिया २०२६ क्रिकेट स्पर्धेने क्रीडाप्रेमींना वेड लावले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत आधुनिक सुविधा, लखलखते एलईडी लाईट्स आणि संगीताच्या तालावर होणारी आतषबाजी यामुळे आयपीएलसारखे भव्य वातावरण निर्माण झाले आहे.

स्पर्धेत केवळ व्यावसायिक खेळाडूच नव्हे, तर सिनेसृष्टीतील कलाकारांनीही बॅट हातात धरली. टीम संजय जाधव आणि टीम सौरभ गोखले यांच्यात अटीतटीची लढत झाली. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या कलाकारांनी मैदानावरही उत्कृष्ट अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. अखेरीस संजय जाधव यांच्या संघाने शानदार विजय मिळवत मानाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

प्रशासकीय कामातून ब्रेक
नेहमी फाइल्स आणि बैठकांमध्ये व्यस्त असणारे ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक यांच्यातील सामना प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातील हा मैत्रीपूर्ण सामना अत्यंत चुरशीचा झाला; मात्र महापालिका अधिकारी संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर नगरसेवकांच्या संघाचा पराभव करीत विजय मिळवला. स्पर्धेच्या भव्य आयोजनाचे कौतुक करतानाच महिलांच्या सहभागाबाबत महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

ठाण्यात अतिशय उत्तम क्रीडा वातावरण तयार झाले आहे. मात्र या स्पर्धेत महिलांचा सहभाग नाही, ही खंत आहे. पुढील वर्षी महिलांसाठीही क्रिकेट किंवा कबड्डीचे आयोजित करावे, अशी माझी आग्रही विनंती आहे.
- मर्जिया पठाण, नगरसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT