मुंबई

वालीव येथील कारखानदारांनी मांडल्या महापौरांपुढे समस्यां

CD

कारखानदारांच्या समस्यांबाबत महापौरांचे आश्वासन

विरार, ता. ५ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील वाढत्या औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर, वालीव येथील कारखानदारांच्या एका शिष्टमंडळाने नुकतेच महापौर अजीव पाटील यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. कारखानदारांच्या या समस्यांचे निवारण करण्याबाबतचे आश्वासन या वेळी महापौरांनी दिलेे.
वसई-विरार शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, सध्याच्या घडीला या भागात १५ हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्योग कार्यरत आहेत. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायांवर अवलंबून असतानाही, कोट्यवधींची उलाढाल करणारे हे कारखाने आजही रस्ते, पाणी, वीज आणि परिवहन यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. कारखानदारांनी या भेटीदरम्यान प्रामुख्याने औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा आणि कामगारांच्या प्रवासासाठी अपुऱ्या असलेल्या परिवहन सेवा या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्यास उद्योजकांना आपला व्यवसाय अधिक सुलभतेने करता येईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, असे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले.
---------
कारखानदारांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर महापौर अजीव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शहरातील कारखानदारी वृद्धिंगत करण्यासाठी आणि उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन या वेळी दिले. या भेटीमुळे आपल्या समस्या सुटतील, अशी आशा आता स्थानिक कारखानदारांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

RCB vs GT Qualifier 1 : कागिसो रबाडाने इतिहास घडवला! मोहम्मद शमीचा विक्रम मोडला, शुभमन गिलच्या अफलातून झेलची हवा... Video

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनेच्या 'या' मागण्या सरकार का स्वीकारत नाही? OPS बाबत महत्त्वाची माहिती...

School Notebook Price Hike : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना झटका! वह्या, पुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ; जून महिना उजाडण्यापूर्वीच बजेट कोलमडणार

सूर्यकुमार यादव IPL 2026 नंतर आता, युगांडा संघाविरुद्ध ट्वेंटी-२० सामना खेळणार! मुंबईत ही मॅच कधी व केव्हा होणार?

SCROLL FOR NEXT