शिंदे गटात खांदेपालट होण्याची शक्यता
विरार, ता. ५ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रथमच शिवसेना वसई तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी पालघर तालुक्यात खांदेपालट होण्याची गडद शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महानगरपालिका निवडणुकीनंतर आलेली मरगळ झटकण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणातून दिसून आले. त्यांनी नव्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करीत पदाधिकाऱ्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचत, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासह शासनाच्या असंख्य योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून कसा पोहोचवावा याचे मार्गदर्शन केले. तसेच दर १५ दिवसांत प्रत्येक शाखेने या विषयाचा आढावा घेण्याबाबतही त्यांनी आदेश दिले. तसेच संघटनवाढीसाठी रिक्त असलेल्या जागा भरण्याचेही त्यांनी सूचना केल्या. या वेळी शिवसेनेच्या नगरसेविका हेमलता सिंह यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बैठकीचे आयोजन जिल्हाप्रमुख नीलेश तेंडोलकर यांनी केले होते. याप्रसंगी जिल्हा सचिव अतुल पाटील, जिल्हा संघटक शीतल कदम आणि शिवसेना व संलग्न संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.