मुंबई

लिंबूच्या किमतीत दुप्पट वाढ

CD

तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : हापूस आंब्यानंतर आता लिंबानेही सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका दिला आहे. गेल्या तीन आठवड्यांत मुंबई आणि नवी मुंबई परिसरात लिंबाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली असून, घाऊक व किरकोळ बाजारात भाव जवळपास दुप्पट झाले आहेत.

वाशी येथील एपीएमसी घाऊक बाजारात काही आठवड्यांपूर्वी दोन ते तीन रुपये प्रति लिंबू असलेला भाव आता वाढून पाच रुपये प्रति लिंबू झाला आहे, तर किरकोळ बाजारात २० रुपयाला चार लिंबू मिळत असताना आता ग्राहकांना त्याच किमतीत फक्त दोन लिंबे घ्यावी लागत आहेत. काही ठिकाणी एका लिंबाचा भाव १० पर्यंत पोहोचला आहे. लिंबू व्यापारी चंद्रकांत महामुळकर म्हणाले, पुरवठा मर्यादित असल्याने मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळेच भाव वाढले आहेत. जोपर्यंत इतर राज्यांतून आवक सुरू होत नाही, तोपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे.

मागणी-पुरवठ्यातील तफावत मुख्य कारण
एपीएमसीमधील व्यापाऱ्यांच्या मते, या भाववाढीमागे अवकाळी पावसाचा फारसा संबंध नसून, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत हेच मुख्य कारण आहे. सध्या बाजारात लिंबाचा पुरवठा प्रामुख्याने आंध्र प्रदेशातून होत असून, महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांतून पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी बाजारात लिंबांची टंचाई निर्माण झाली आहे.

उन्हाळ्यातील वाढती मागणी
मार्च ते जून हा उन्हाळ्याचा कालावधी लिंबाच्या मागणीचा शिखर काळ मानला जातो. या काळात लिंबू सरबत, थंड पेये आणि घरगुती वापरासाठी लिंबाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे कमी पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने भाव अधिकच वाढले आहेत.

हॉटेल व सरबत विक्रेत्यांचे भाव वाढले
लिंबाच्या वाढत्या किमतीचा परिणाम थेट खाद्य व्यवसायावरही झाला आहे. लहान उपाहारगृहांपासून ते रस्त्यावरील हातगाड्यांपर्यंत सर्वत्र भाववाढ दिसून येत आहे. पूर्वी १० रुपयांना मिळणारे लिंबू सरबत आता २० रुपये प्रति ग्लास झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता; मराठवाड्यातही पावसाचा अंदाज..

Latest Marathi News Live Update : विदर्भात उष्णतेच्या लाटेचे उग्र रूप; वर्ध्यात पारा ४७ अंशांवर

NEET पेपर लीक प्रकरणात पुण्यातील नामवंत डॉक्टर अटकेत, मोटेगावकर कनेक्शन काय? CBIची मोठी कारवाई

Kerala Rail Project: केरळमधील ‘सिल्व्हरलाइन’ अखेर रद्द; हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा ‘एलडीएफ’चा निर्णय गुंडाळला

Sangli Road Accident : मित्रांच्या डोळ्यांदेखत घडलं भयंकर! अलिशान दुचाकीवरून निघालेल्या 19 वर्षीय ऋषिकेशवर काळाचा घाला, हेल्मेट फुटून जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT