उल्हासनगर, ता. ५ (बातमीदार) : वाहनाच्या बिघाडाचा फायदा घेत बोनेटवर ठेवलेले मौल्यवान साहित्य चोरणाऱ्या सराईत चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल १० गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
बदलापूर पश्चिमेतील बेलवली परिसरात राहणारे जयराम ओटे हे दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास उल्हासनगरहून कल्याण-अंबरनाथ मार्गावरून आपल्या कारने प्रवास करत होते. १७ सेक्शन परिसरात त्यांच्या वाहनाच्या बोनेटमधून धूर निघू लागल्याने त्यांनी गाडी थांबवली. याच वेळी चोरट्याने संधी साधत बोनेटवर ठेवलेला मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना आणि सुमारे चार हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे आणि पोलिस निरीक्षक तुकाराम पादिर यांनी विशेष तपास पथक तयार केले. सहाय्यक निरीक्षक राकेश शेवाळे आणि त्यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान संशयिताला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याच्याकडून तीन दुचाकी, तीन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केले. तपासादरम्यान मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन आणि विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्ह्याची उकल झाली. याशिवाय परिमंडळ तीन क्षेत्रातील सहा घरफोड्यांमध्येही आरोपीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.