मुंबई

टिटवाळा महागणपती मंदिरात भाविकांची रांग

CD

टिटवाळा महागणपती मंदिरात संकष्टीचा उत्साह
उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारच्या सत्रात गर्दी ओसरली

टिटवाळा, ता. ५ (वार्ताहर) : संकष्ट चतुर्थीनिमित्त टिटवाळ्याच्या ऐतिहासिक महागणपती मंदिरात रविवारी (ता. ५) भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली. पहाटेपासूनच मंदिरात भक्तीचे वातावरण असले, तरी नेहमीच्या तुलनेत भाविकांची संख्या काहीशी कमी दिसून आली. वाढते ऊन आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ यामुळे सकाळच्या सत्रात गर्दीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सकाळच्या वेळी आलेल्या भाविकांनी उन्हाचा तडाखा जाणवण्यापूर्वीच शांततेत रांगेत उभे राहून दर्शन घेतले. मंदिराचा गाभारा फुलांनी आकर्षकरीत्या सजवण्यात आला असून, पुजाऱ्यांच्या वतीने विशेष अभिषेक आणि पूजाअर्चा करण्यात आली. भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने नारळ, फुले आणि प्रसाद अर्पण करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

उन्हाचा तडाखा
एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानामुळे अनेक भाविकांनी दुपारची वेळ टाळली आहे. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने कुटुंबांच्या उपस्थितीवर मर्यादा आल्या आहेत. दुपारच्या सत्रात भाविकांची संख्या मर्यादित असली, तरी मंदिर प्रशासनाने नियोजनात कोणतीही कसर सोडलेली नाही. पिण्याच्या पाण्याची सोय आणि रांगेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आणि रांगेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Maharashtra 2026 : मॉन्सून केरळमध्ये ४ दिवस आधीच पोहोचणार, पण महाराष्ट्रात कधी दाखल होणार? नवी अपडेट समोर

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यात चर्चा सुरू

Maharashtra Electricity: थेट ग्राहकांना शॉक! महावितरणची वीजगळती १५% वर; ८०० कोटींचा थेट भुर्दंड ग्राहकांवर..

Bharat Forecast System : हवामानाच्या संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्राला मिळालं 'ब्रह्मास्त्र'; IITM च्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे आता काळजी मिटली, पाहा काय आहे नवीन प्रणाली?

Maharashtra Politics: आमदार होईपर्यंत अनवाणी’ संकल्प पूर्ण; नवसपूर्तीप्रसंगी नेता अन् कार्यकर्त्याच्या डोळ्यांत आश्रू, शिर्डीत निष्ठेचे अनोखे दर्शन..

SCROLL FOR NEXT