मुंबई

येत्या ११ एप्रिलला नर्मदा परिक्रमा करणाऱ्या वारकऱ्यांचे आगमन सोहळा

CD

१०८ दिवसांची खडतर नर्मदा परिक्रमा पूर्ण
११ एप्रिलला कोपरखैरणेत वारकऱ्यांचा आगमन सोहळा
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : कोपरखैरणे आणि कोपरी गावातील दोन वारकऱ्यांनी अनवाणी पायी केलेली १०८ दिवसांची श्री नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. यानिमित्ताने येत्या शनिवारी (ता. ११) सकाळी ९ वाजता कोपरखैरणे येथे एका भव्य आणि भक्तिमय आगमन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
कोपरखैरणे गावातील पखवाज वादक हभप धनंजय वेटा आणि कोपरी गावातील हभप विशाल पाटील यांनी २२ डिसेंबरला या परिक्रमेचा संकल्प केला होता. अत्यंत कठीण समजली जाणारी ही यात्रा अनवाणी पायी पूर्ण करून हे दोन्ही वारकरी आता स्वगृही परतत आहेत. या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी कोपरखैरणे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. श्री हनुमान प्रासादिक हरिपाठ मंडळ आणि विठ्ठल-रखुमाई वारकरी सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडी काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET पेपर लीक प्रकरणात पुण्यातील नामवंत डॉक्टर अटकेत, मोटेगावकर कनेक्शन काय? CBIची मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ब्लॅक पँथर संघटनेची मागणी

Kerala Rail Project: केरळमधील ‘सिल्व्हरलाइन’ अखेर रद्द; हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा ‘एलडीएफ’चा निर्णय गुंडाळला

Sangli Road Accident : मित्रांच्या डोळ्यांदेखत घडलं भयंकर! अलिशान दुचाकीवरून निघालेल्या 19 वर्षीय ऋषिकेशवर काळाचा घाला, हेल्मेट फुटून जागीच मृत्यू

RBI Mobile Loan Rules : आता EMI थकवल्यास बँक तुमचा मोबाईल करणार बंद; आरबीआयचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT