मुंबई

जोगेश्वरीत दूषित पाण्याने रहिवासी त्रस्त

CD

जोगेश्वरीत दूषित पाण्यामुळे रहिवासी त्रस्त

जोगेश्वरी, ता. ५ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी परिसरामधील गजानन निवास वेलफेअर सोसायटीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. येथे नळावाटे येणारे पाणी गढूळ, काळपट व दुर्गंधीयुक्त असल्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
येथे नळावाटे येणारे पाणी पूर्णतः गढूळ व अस्वच्छ असून, त्यातील घाण स्पष्टपणे दिसून येत आहे. येथील स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे रात्री १२ ते १२.३० या वेळेत केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होतो; मात्र या वेळेत येणारे पाणी अत्यंत दूषित, घाणेरडे व वापरास अयोग्य असते. याउलट सकाळी ५.३० वाजल्यापासून सुमारे दोन ते अडीच तास पाणीपुरवठा होतो. या वेळेत येणारे पाणी तुलनेने काहीसे स्वच्छ असते. त्यामुळे पाण्याच्या दाबातील बदलांमुळे पाइपलाइनमध्ये सांडपाण्याची मिसळ होत असल्याचा संशय रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

जाणकारांच्या मते, जुन्या व गंजलेल्या जलवाहिन्या तसेच कमी दाबाच्या स्थितीत होणाऱ्या ‘बॅक सायफोनेज’ प्रक्रियेमुळे दूषित पाणी पिण्याच्या लाईनमध्ये खेचले जाऊ शकते. यामुळेच रात्रीच्या वेळी अशा प्रकारचा दूषित पाणीपुरवठा होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दूषित पाण्यामुळे टायफॉइड, गॅस्ट्रो, त्वचारोग यासारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढला असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
---------------
प्रशासनाने तातडीने जलवाहिन्यांची तपासणी करून गळती दुरुस्त करावी. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी आमची मागणी आहे. सध्या तरी या गंभीर प्रकारामुळे संतप्त रहिवाशांनी तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
- संदीप कसाळकर, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT