मुंबई

“सायबर गुन्हे” जनजागृती मोहीमेचे आयोजन

CD

‘सायबर गुन्हे’ जनजागृती मोहीमेचे आयोजन

मुलुंड, ता. ५ (बातमीदार) : सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ भांडुपच्या आर. के. लॉ महाविद्यालय येथे ‘सायबर क्राइम जनजागृती’ या विषयावर मुंबई पोलिसांचे मार्गदर्शनपर व्याख्यान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सायबर क्राइमला निवृत व जेष्ठ नागरिक बळी पडत आहेत. त्यामुळे सायबर क्राइमबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याने संचालक रिद्धेश खानविलकर यांच्या विनंतीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज गायकवाड, गणेश बागुल, पूर्व उपनगर विभाग सायबर पोलिस ठाणे, शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल अरेस्ट, सोशल मीडिया स्कॅम, नोकरी संबंधी ऑनलाइन स्कॅम, ऑनलाइन खरेदी विक्री स्कॅम,फेक लिंक्स, फेक पीडीएफस् इत्यादी गुन्ह्यासंबंधी माहिती दिली. तसेच असे काही गुन्हे घडल्यास खबरदारी कोणती घ्यावी? याविषयीदेखील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

असे गुन्हे आपल्या सोबत व आपल्या संबंधितांसोबत घडल्यास उपाय म्हणून १९३० हा हेल्पलाइन क्रमांक व cybercrime.gov.in या संकेतस्थळाविषयी माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले व विद्यार्थ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून शंकांचे निरसन केले. हे व्याख्यान आर. के. लॉ कॉलेजचे संचालक रिद्देश खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक शिवानंद शेट्टी, प्राध्यापिका अक्षता पवार व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडले. आर. के. लॉ कॉलेजच्या वतीने ईशान्य मुंबईत सायबर क्राइम जनजागृती मोहीम राबविण्याची सुरुवात झाली असल्याने नागरिकांना या शिबिराचा नक्की फायदा होईल, असा विश्वास अध्यक्ष रमेश खानविलकर यांनी या वेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT