मुंबई

‘एपीके फाईल’चा सापळा; गॅस बील अपडेटच्या नावाखाली ठाण्यात पावणे सोळा लाखांची

CD

‘एपीके फाईल’चा सापळा;
पावणेसोळा लाखांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : महानगर गॅस बिल अपडेटच्या नावाखाली ‘एपीके फाईल’ पाठवून सायबर गुन्हेगारांनी ठाण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोठी फसवणूक केली आहे. या प्रकरणांमध्ये एकूण सुमारे पावणेसोळा लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला असून, कापूरबावडी व चितळसर या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत बाळकूम परिसरातील ब्रिजभूषण आनंद (७८) यांना व्हॉट्सअ‍ॅपवर गॅस बिल न भरल्याने कनेक्शन बंद होईल, असा संदेश आला. संबंधित व्यक्तीने अजय कुमार मिश्रा असे नाव सांगत १३ रुपयांचे शुल्क भरण्यास सांगितले. त्यानंतर पाठवलेल्या एपीके फाईलवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून १३ लाख ९८ हजार २२६. ७६ रुपये काढण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तत्काळ बँक खाते लॉक करून एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार नोंदवली. तर दुसऱ्या घटनेत मानपाडा येथील विशाल पाटील (२८) यांनाही गॅस मीटर अपडेटसाठी २५ रुपये भरण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. आरोपीने एपीके फाईल डाऊनलोड करून मोबाईलमध्ये सेटिंग बदलण्यास सांगितले आणि स्क्रीन शेअरिंगद्वारे ओटीपी मिळवून दोन व्यवहारांत ८० हजार रुपये काढले. पुढील व्यवहार कार्ड लिमिटमुळे अयशस्वी ठरले. दोन्ही प्रकरणांत सायबर गुन्हेगारांनी मोबाईलमध्ये एपीके फाईल इन्स्टॉल करून आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण मिळविल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT