मुंबई

भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध

CD

भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित तीन समित्यांच्या सभापतिपदासाठी प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात असल्याने त्यासाठी निवडणूक पार पडणार आहे.

सहा समित्यांच्या सभापतिपदासाठी मंगळवारी (ता. ७) निवडणूक होणार आहे. त्यापैकी प्रभाग एक, दोन व तीनसाठी केवळ भाजपकडून उमेदवारी अर्ज आल्याने अनुक्रमे भाजपच्या वर्षा भानुशाली, सुनीता जैन व मदन सिंह यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड होणार आहे. प्रभाग चारच्या सभापतिपदासाठी भाजपचे संजय थेराडे यांच्याविरुद्ध कॉँग्रेसच्या सना देशमुख, समिती पाचसाठी भाजपचे दिनेश जैन विरुद्ध कॉँग्रेसचे अश्रफ मिस्त्री व समिती सहासाठी भाजपचे प्रशांत दळवी विरुद्ध कॉँग्रेसच्या आयरीन कॉड्रस अशी लढत होणार आहे; मात्र तिन्ही समित्यांमध्ये भाजपचेच संख्याबळ अधिक असल्याने भाजपचे उमेदवार निवडून येणार, हे निश्चित आहे. त्यामुळे सर्व सहा प्रभाग समित्या भाजपच्याच ताब्यात जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT